Please enable javascript.BBC Russian" type="text/javascript">
Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook

Ahmednagar News in Marathi

    Ahmednagar Marathi News: अहमदनगर हा क्षेत्रफळाने महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा जिल्हा आहे(Ahmednagar News). नगरला सात जिल्ह्यांच्या सीमांनी जोडले आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असेलेला अहमदनगर जिल्हा सहकारी चळवळीसाठीही ओळखला जातो. राज्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणारे नेतृत्व या जिल्ह्यात नेहमीच घडले(Ahmednagar Crime). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तीर्थक्षेत्र शिर्डी, मेहेरबाबांची समाधी, घरांना दारे नसलेले शनिशिंगणापूर, अहिल्यादेवींचे जन्मस्थान चौंडी ही धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळेही या जिल्ह्यात आहेत. राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना या जिल्ह्यात स्थापन झाला. लोकसभेचे दोन आणि विधानसभेचे बारा मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत (Ahmednagar Weather). स्वातंत्र्य चळवळीतही जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले. अनेक संत-महंतांची भूमी म्हणून नगरची ओळख आहे. जिल्ह्याचे मुख्यालय अहमदनगर हे शहर अहमद निजाम शाह याने इ.स. १४९६ मध्ये वसविलेले. निजामशाहीच्या राजधानीचे शहर पुढे त्याच्याच नावाने ओळखले जाऊ लागले. त्याची समाधीही या शहरात आहे.