Please enable javascript.BBC Russian
Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook

मोठ्या प्रतीक्षेनंतर लीड घेतलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, पत्नीची उदयनराजेंना मिठी, डोळ्यातून अश्रू वाहिले!

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2024, 2:37 pm
Subscribe

Satara Lok Sabha : सातारा लोकसभेतून उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतल्यानंतर जलमंदिर पॅलेसला कार्यकर्त्यांनी गर्दी केली. राजेंच्या नावाची घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी उदयनराजे कमालीचे भावुक झाले. त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले देखील उदयनराजेंसमवेत होत्या.

Satara lok Sabha (1)
सातारा लोकसभा
सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी एक मानल्या गेलेल्या आणि शरद पवार यांच्या विचारांचा बालेकिल्ला असलेल्या सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. १४ व्या फेरीअखेर भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांनी ४ हजार मतांची आघाडी घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जलमंदिर पॅलेसवर जाऊन जोरदार जल्लोष केला. यावेळी उदयनराजे भावुक झाले होते. पत्नीला मिठी मारताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. उदयनराजेंचा हा व्हिडिओ समाज माध्यमांत चांगलाच व्हायरल झाला.

राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक असतानाही खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपने उमेदवारी दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधान परिषदेचे आमदार आमदार शशिकांत शिंदे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करण्यात आला. सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण ६३.१६ टक्के मतदान झाले. मतदानोत्तर चाचणीत शशिकांत शिंदे यांच्याकडे जनतेचा कल होता. मतमोजणीकडे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्ष लागलेले होते. मान गादीला देऊन जनता मत राष्ट्रवादीला देणार, असा प्रचार करण्यात आला.
National Iframe -

सातारा लोकसभेतून उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतल्यानंतर जलमंदिर पॅलेसला कार्यकर्त्यांनी गर्दी केली. राजेंच्या नावाची घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी उदयनराजे कमालीचे भावुक झाले. त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले देखील उदयनराजेंसमवेत होत्या. त्यांनी उदयनराजेंना प्रेमाने मिठी मारली, त्यावेळी कार्यकर्त्यांनीही जोरदार जल्लोष केला. कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून उदयनराजेंनी हात जोडत त्यांचे आभार मानले.
अक्षय आढाव
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज