Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Transfiguration pending
Jump to content

जॉन विक्लिफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन विक्लिफ

जॅान विक्लिफ (इ.स. १३२० - इ.स. १३८४) याला युरोपमधील धर्मसुधारणा चळवळीचा आद्यप्रणेता म्हणले जाते. तो धर्मसंस्थेवर टीका करणारा व धर्मसुधारणा चळवळ सुरू करणारा पहिला विचारवंत होता. म्हणून त्याला धर्मसुधारणा चळवळीचा शुक्रतारा मानले जाते. तो इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाचा प्राध्यापक होता. त्याने लॅटिनमधील बायबलचे सोप्या इंग्रजीत भाषांतर करून तो ग्रंथ सर्वसामान्यांर्यंत पोचवला. विक्लिफने पोपच्या अनियंत्रित सत्तेविरूद्ध चळवळ सुरू केली. तसेच धार्मिक अंधश्रद्धेवर टीका केली. त्यामुळे त्याला ऑक्सफर्ड विद्यापीठातील नोकरी गमवावी लागली. त्याच्या मृत्युनंतर त्याचे प्रेत उकरून उकिरड्यावर टाकले गेले.