Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

कमला हॅरिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कमला हॅरिस

अमेरिकेची ४९वी उपराष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२० जानेवारी २०२१
राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन, जुनियर
मागील माइक पेन्स

कार्यकाळ
३ जानेवारी २०१७ – १९ जानेवारी २०१८
मागील बार्बरा बॉक्सर
पुढील ॲलेक्स पादिया

कार्यकाळ
३ जानेवारी २०११ – ३ जानेवारी २०१७
मागील जेरी ब्राउन
पुढील जेरी ब्राउन

जन्म २० ऑक्टोबर, १९६४ (1964-10-20) (वय: ५९)
ओकलंड, कॅलिफोर्निया
राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक
पती डग एमहॉफ
अपत्ये २ सावत्र मुले
गुरुकुल हॉवर्ड विद्यापीठ (बीए)

कमला देवी हॅरिस (२० ऑक्टोबर, १९६४: ओकलंड, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) या भारतीय वंशाच्या अमेरिकन वकील, लेखिका आणि राजकारणी आहेत. २०१० मध्ये झालेल्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या निवडणुकीमध्ये त्यांची ॲटर्नी जनरल पदावर नेमणूक झाली. त्या कॅलिफोर्निया राज्याच्या ३२व्या ॲटर्नी जनरल आहेत. ७ नोव्हेंबर, २०२० रोजी त्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून गेल्या. त्यांनी २० जानेवारी, २०२१ रोजी या पदाची शपथ घेतली.

२०२४ च्या निवडणुकांमध्ये हॅरिस तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या बरोबर त्या उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी पुन्हा उभ्या होत्या. बायडेन यांनी माघार घेतल्यावर हॅरिस यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या बरोबर टिम वॉल्झ हे उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उभे आहेत.