Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

क्रिश (हिंदी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्रिश या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रिश
दिग्दर्शन राकेश रोशन
प्रमुख कलाकार रेखा
हृतिक रोशन
प्रियांका चोप्रा
नसीरुद्दीन शाह
संकलन अमिताभ शुक्ला
संगीत राजेश रोशन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित जून २३, २००६
अवधी १७६ मिनिटे



क्रिश हा चित्रपट बॉलीवूडच्या कोई... मिल गया या सुपरहीट चित्रपटाचा उत्तर-कृति आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन यांनी या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. कोई मिल गया प्रमाणेच क्रिश चित्रपट ही एक वि‍ज्ञान परिकल्पना आहे. हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी १७ कोटी रुपये खर्च झाले. तसेच या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी राकेश रोशन यांनी १२ कोटी रुपये खर्च केले.

कथानक

[संपादन]

एका परग्रहवासियाकडून रोहित मेहराला (ॠतिक रोशन) मिळालेली अनैसर्गिक शक्ती कृष्णा मेहरा या त्याच्या मुलाकडेही येते. या शक्तीमुळे त्याला जलद गती व ताकद मिळते. चित्रपटातील त्याची प्रेयसी प्रिया (प्रियांका चोप्रा) त्याला सिंगापूरला घेऊन जाते. तिथे तो विकृत वैज्ञानिक डॉ. सिद्धांत आर्या (नसीरुद्दीन शाह) पासून जगाला वाचवितो.