Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

गॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोमन तज्ज्ञांच्या मते गॉलचे पाच भाग होते: सिलाल्पिन (आजचा उत्तर इटली); नार्बोनेन्सिस (आजचा दक्षिण फ्रान्स); आक्युतेन (आजचा नैऋत्य फ्रान्स); बेल्गिका (आजच्या नेदरलँड्स, बेल्जियम, लक्झेंबर्गजर्मनी देशांचे काही भाग) व सेल्टिका (आजचा फ्रान्स)

गॉल (लॅटिन: Gallia, फ्रेंच: Gaule) हा लोह युगादरम्यानचा पश्चिम युरोपातील एक प्रदेश होता. सध्या ह्या भूभागावर फ्रान्स, स्वित्झर्लंड, बेल्जियम, लक्झेंबर्ग, नेदरलँड्सजर्मनी ह्या देशांचे शासन आहे. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकामध्ये गॉल साम्राज्याने यशाचे शिखर गाठले. परंतु इ.स. पूर्व दुसऱ्यापहिल्या शतकामध्ये रोमन साम्राज्याने गॉलसोबत युद्ध केले व संपूर्ण गॉल प्रदेशावर सत्ता स्थापन केली. रोमनांनी गॉलवर सुमारे ५ शतके राज्य केले.

गॉल प्रदेशामधील लोक गॉलिक भाषा (सेल्टिक भाषासमूहामधील एक लुप्त झालेली भाषा) वापरत असत.