बाग्राम
Appearance
बाग्राम हे अफगाणिस्तानमधील शहर आहे.
व्यूहात्मक महत्त्व
[संपादन]काबुलच्या वायव्येस ६० किमी वर असलेल्या या शहराचे प्राचीन नाव कपीसी किंवा कपीसा असे आहे. हे व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे कारण घोरबंद व पंजशेर दऱ्यांच्या मध्ये असल्यामुळे या येथुन रेशीम रस्त्यावर लक्ष ठेवता येते तसेच मध्य एशियातून भारताकडे जाणारा रस्ताही येथूनच जातो.
इतिहास
[संपादन]येथे सायरस, दरायस, सिकंदर ई. जेते आल्याची नोंद आहे. कुषाण सम्राट कनिष्कने हे शहर मोठे केले व कुषाण साम्राज्याची उन्हाळी राजधानी केले.
इ.स. २००१च्या आक्रमणानंतर अमेरिकेने येथे मोठा हवाईतळ उभारला आहे.