Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

भक्ती बर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भक्ती बर्वे
जन्म भक्ती बर्वे- इनामदार
सप्टेंबर १०, इ.स. १९४८
मृत्यू फेब्रुवारी १२, इ.स. २००१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके ती फुलराणी, आई रिटायर होतेय
प्रमुख चित्रपट जाने भी दो यारों, बहिणाबाई, वगैरे.
प्रमुख टीव्ही कार्यक्रम वृत्तनिवेदिका
पती शफी इनामदार

भक्ती बर्वे-इनामदार (सप्टेंबर १०, इ.स. १९४८ - फेब्रुवारी १२, इ.स. २००१) ह्या मराठी अभिनेत्री होत्या.

त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णराव. ते इ.स. १९८९मध्ये हृदयविकाराने निर्वतले. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे हे भक्तीचे चुलतभाऊ. सुरेश सख्खा भाऊ आणि उल्का बहीण.

पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी या नाटकातील भक्ती बर्वे यांची प्रमुख भूमिका असे. 'फुलराणी'चे ११११हून अधिक प्रयोग झाले. आई रिटायर होतेय या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. भक्ती बर्वे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्याऐवजी स्मिता जयकर त्या नाटकात काम करू लागल्या.

मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना इ.स. १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले[१]. हिंदी चित्रपटांतील आघाडीचे सहअभिनेते शफी इनामदार यांच्याशी विवाह झाला. फेब्रुवारी १२ इ.स. २००१ रोजी त्यांना मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गावरअपघाती मृत्यू आला.

आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. अशोक हांडे यांच्या 'माणिकमोती' या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे.

भक्ती बर्वे यांच्या भूमिका असलेली नाटके

[संपादन]
  • अखेरचा सवाल
  • अल्लाउद्दीन व जादूचा दिवा (बालनाट्य)
  • अजब न्याय वर्तुळाचा
  • आई रिटायर होतेय (मराठी आणि गुजरातीत-बा रिटायर थाय छे)
  • आधे अधुरे(हिंदी आणि मराठी)
  • आले देवाजीच्या मना
  • कळलाव्या कांद्याची कहाणी (बालनाट्य)
  • गांधी आणि आंबेडकर
  • घरकुल
  • चिनी बदाम (बालनाट्य)
  • जादूची वेल (बालनाट्य)
  • टिळक आणि आगरकर
  • ती फुलराणी
  • दंबद्वीपचा मुकाबला
  • पपा सांगा कुणाचे
  • पळा पळा कोण पुढे पळे तो
  • पुरुष
  • पुलं, फुलराणी आणि मी
  • बाई खुळाबाई
  • बूटपोलिश
  • माणसाला डंख मातीचा
  • मिठीतून मुठीत
  • रंग माझा वेगळा
  • रातराणी (मराठी, हिंदी आणि गुजराती)
  • वयं मोठं खोटम् (बालनाट्य)
  • शॉर्टकट
  • सखी प्रिय सखी
  • हॅंड्स अप

प्रमुख चित्रपट

[संपादन]

भक्ती बर्वे यांच्यावरील लिखित साहित्य

[संपादन]
  • एक होती फुलराणी - भक्ती बर्वे (चरित्र, लेखक : रजनीश जोशी)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते" (इंग्लिश भाषेत). रोजी मूळ पानापासून संग्रहित2011-10-02. १५ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: BOT: original-url status unknown (link)

बाह्य दुवे

[संपादन]