Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

रजनीकांत आरोळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रजनीकांत आरोळे
जन्म रजनीकांत
१८ सप्टेंबर, इ.स. १९३४
राहुरी, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू २६ मे, इ.स. २०११;
पुणे, महाराष्ट्र
मृत्यूचे कारण हृदयविकाराचा तीव्र धक्का
निवासस्थान जामखेड महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण एम्.बी.बी.एस्., एम.डी.
प्रशिक्षणसंस्था वैद्यकीय महाविद्यालय, वेल्लोर, जॉन हॉपकिन्स विद्यापीठ
पेशा वैद्यकीय,समाजसेवा
कारकिर्दीचा काळ १९७०-२०११
प्रसिद्ध कामे ग्रामीण आरोग्य प्रकल्प, जामखेड
कार्यकाळ १९७०-२०११
धर्म ख्रिश्चन
जोडीदार मेबल आरोळे
अपत्ये रवी, डॉ.शोभा
पुरस्कार मॅगसेसे पुरस्कार(१९७०), पद्मभूषण(१९९०)


रजनीकांत शंकरराव आरोळे (जन्म :१८ सप्टेंबर, इ.स. १९३४:राहुरी, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - - २६ मे, इ.स. २०११:पुणे, महाराष्ट्र) हे महाराष्ट्रातील जामखेड येथील डॉक्टर व समाजसेवक होते. त्यांनी आरोग्यसुविधा गोरगरिबांपर्यंत पोहचवण्यात मोलाची कामगिरी बजावली.

शिक्षण[संपादन]

आरोळ्यांनी इ.स. १९५९ वेल्लोर येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एम.बी.बी.एस. पूर्ण केले. त्यांनी १९६० मध्ये कर्नाटकातील कोलार येथे निवासी डॉक्टर म्हणून आरोग्य सेवेला प्रारंभ केला. यानंतर १९६२ साली त्यांना नगर जिल्ह्यातील वडाळा मिशनमध्ये काम करण्याची संधी मिळाली.[१] त्यांनी फुलब्राइट शिष्यवृत्तिधारक म्हणून त्यांनी अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.[२]

समाजकार्य[संपादन]

त्यांनी, इ.स. १९७० साली त्यांच्या पत्नी मेबेल आरोळे यांच्या सहकार्याने जामखेडच्या ग्रामीण भागात गोरगरिबांसाठी ग्रामीण आरोग्य प्रकल्प सुरू केला. कोठारी कुटुंबीयांनी दान दिलेल्या ७ एकर जमिनीवर त्यांनी हा प्रकल्प राबवायला सुरुवात केली. तेथे त्यांनी अनेक गरिबांना मोफत आरोग्यसेवा पुरविली. त्यांनी मुख्यत्वे कुष्ठरोग, क्षयरोग, आदिवासी भागातील बाळंतपणानंतरचे जंतुसंसर्ग व कुपोषण यावर कार्य केले. त्यांच्या वडाळा मिशन या संस्थेच्या कार्यक्षेत्रात ३०० खेडी येतात.

निधन[संपादन]

आरोळे अखेरच्या कालखंडात ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होते. प्रकृती अधिकच बिघडल्याने २५ मे, इ.स. २०११ला त्यांना जामखेडहून पुण्यातील पूना हॉस्पिटल येथे हलविले. उपचार सुरू असताना रात्री १०.१५ वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. २६ मे, इ.स. २०११ रोजी जामखेड येथे त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "डॉ. रजनीकांत आरोळे पंचत्त्वात विलीन".[permanent dead link]
  2. ^ "लोकआरोग्य विद्यापीठ".[permanent dead link]
  3. ^ "सायटेशन्स फॉर रजनीकांत शंकरराव आरोळे ॲन्ड मेबेल रजनीकांत आरोळे" (इंग्लिश भाषेत). 2011-06-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-28 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)